breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीत ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस पासचे वाटप

निलेश बोराटे यांच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम

पिंपरी | प्रतिनिधी

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशीतील युवा नेते निलेश उद्धव बोराटे यांच्या माध्यमातून नुकताच ज्येष्ठ नागरिकांना सवलतीत एसटी बस पासच्या स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. या वेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून या योजनेचा लाभ घेतला. भाजप युवा मोर्चा शहर जिल्हा युवती सोशल मीडियाच्या संयोजिका पूजा आल्हाट आणि भाजपा महिला मोर्चा वैद्यकीय आघाडी अध्यक्षा विजया आल्हाट यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

निलेश बोराटे यांनी मोशी भागातील सर्व नागरिकांसाठी विविध उपक्रम, तसेच शासनाच्या व महापालिकेच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. कोरोना काळातही त्यांनी भाजीपाला वाटप, अन्नधान्य वाटप, आरोग्य तपासणी, धुर फवारणी, औषध फवारणी, सॅनिटायझर वाटप, जनजागृतीपर कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले. त्यातच आता राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात पास स्मार्ट कार्ड देण्याची योजना त्यांनी मोशीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली. या उपक्रमात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून साध्या, निमआराम, शिवशाही (स्लिपर आणि सिटिंग) बसमध्ये प्रवासभाड्यात सवलत 4 हजार किलोमीटरपर्यंत देण्यात येत आहे. साध्या, निमआराम बसमध्ये प्रवासभाड्यात 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. आसन व्यवस्था असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासभाडयात ही सवलत 45 टक्के आहे. शयनशान व्यवस्था असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासभाडयात ही सवलत 30 टक्के आहे. या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल मोशीतील ज्येष्ठ नागरिकांनी निलेश बोराटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया –  

केंद्र शासन, राज्य शासन, तसेच स्थनिक स्वराज्य संस्थांच्या वतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना जाहीर केल्या जातात. पण काही कारणास्तव काही योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचत नाही. आणि दुर्दैवाने पात्र असणारे नागरिकही अशा योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. म्हणूनच आम्ही येत्या काळात शासनाच्या सर्व छोट्या मोठ्या योजनांचा आढावा घेऊन त्या तळागाळातील नागरिकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून नागरिकांच्या हक्काच्या योजना व त्यांचा लाभ त्यांना मिळावा. येत्या काळातही आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असे विविध उपक्रम राबविणार आहोत.

– निलेश उद्धव बोराटे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button