breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोर्शीतील स्वाभिमानीच्या उमेदवाराची गाडी जाळली

अमरावती – मोर्शी वरूड मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाआघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

देवेंद्र भुयार यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करून त्यांची गाडी जाळून टाकली. सुदैवाने देवेंद्र भुयार या घटनेतून बचावले असून त्यांच्यासह घटनेवेळी इतर कार्यकर्तेही होते. देवेंद्र भुयार हे भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांच्याविरोधात उभे आहेत. मतदानाच्या दिवशीच ही घटना घडल्याने मतदानाला गालबोट लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरम्यान या घटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी फेसबुक लाईव्ह करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोर्शी वरुडमध्ये पैशांचे वाटप सुरू असून आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही त्याचा पाठपुरावा करण्यात आला नाही. जेव्हा आमचे कार्यकर्ते पैसे वाटपाच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी जात असताना अज्ञातांनी दबा धरून त्यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button