breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोरवाडीतील मेट्रो स्टेनशमुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्याला धोका
  • मेट्रो स्टेशन एम्पायर पुलाकडे स्थलांतरीत करण्यात यावे
  • शक्य नसल्यास 10 गुंठे जागेत होळकर स्मारक विकसित करावे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समोरील कै. अण्णासाहेब मगर यांचा पुतळा आणि मनपा भवनाचे इलेव्हेशन अबाधित ठेवण्यासाठी मेट्रोचे मोरवाडीतील स्टेशन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या बाजुला स्थलांतरित केल्याचा आक्षेप धनगर समाज बांधवांनी घेतला आहे. येथील मेट्रोचे स्टेशन पुढे एम्पायर इस्टेट पुलाच्या बाजुला स्थलांतरीत करण्यात यावे, अशी मागणी समाजाच्या वतीने नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली आहे.

पुणे मेट्रोचे काम केवळ पिंपरी-चिंचवडमध्ये अतिवेगाने सुरू आहे. मेट्रोचे पिंपरीतील स्टेशन मोरवाडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर येत आहे. मेट्रो स्टेशनचा जिना हा होळकर चौकात पिंपरीच्या बाजुकडील रस्त्याने सुरु होत आहे. स्टेशनचा काही भाग बरोबर पुतळ्याचे वर येणार असून स्टेशनची उंची पुतळ्याचे वर सुमारे २.५० मी. असणार आहे. त्यामुळे पुतळा झाकला जाऊन पुतळ्यावर संपुर्ण सावली पडणार आहे. मेट्रोचा पिलर पुतळ्याचे समोर येणार आहे. यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यास अडथळा येणार आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखविल्या जाणार आहेत.

मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलुन मेट्रो स्टेशन होळकर चौकालगत एम्पायर इस्टेट पुलाचे बाजुला स्थलांतरीत करण्यात यावे. मेट्रो स्टेशनला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक” असे नाव देण्यात यावे. स्टेशनची मिरर इमेज करुन स्टेशन स्थलांतरीत करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नसल्यास होळकर यांचा पुतळा मेट्रो स्टेशनखाली येत असल्याने पुतळा मागील जागेत स्थलांतरीत करावा. त्यासाठी आवश्यक १० गुंठे जागेचा ताबा पालिकेकडे हस्तांतरीत करुन पुतळा व परिसर विकसीत करावा, अशा सूचना धनगर समाजाच्या वतीने नगरसेविका आशा शेंडगे यांनी मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांना केल्या आहेत. त्यामध्ये मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, कर्मयोगी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, अहिल्यादेवी सेवा संघ समिती, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी-चिंचवड आदी संघटनांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button