breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोबाईल टाॅवरची थकबाकी न भरणा-यावर कारवाई करा

  •  विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध मोबाईल कंपन्यांनी अधिकृत तर अनधिकृत मोबाईल टॉवर उभारलेले आहेत. या मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून मनपा मिळकतकर वसुली करण्यात येते. परंतु, शहरातील अनधिकृत व अधिकृत मोबाईल कंपन्यांच्या टॉवरची मिळकत कर वसुली सन २०१६ ते २०१८ या कालावधीत सुमारे २२.४३ कोटी एवढी एकुण थकबाकी आहे. त्याकडे कर संकलन अधिकारीचे दुर्लक्ष करीत असून थकबाकी न भरणा-यावर कडक कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. 

यासंर्दभात आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले, त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मपाची जकात बंद झाल्यानंतर एल.बी. टी. व्दारे मनपाचे स्वत: उत्पन्न होते परंतु गेली दोन तीन वर्षापासून एल.बी.टी. बंद करण्यात येऊन जी.एस.टी. सुरु करण्यात आले आहे. व त्याव्दारे शासनाकडे सर्व महसूल जमा होतो. व महानगरपालिकेसाठी शासन ठराविक अनुदान देते. त्यामुळे ऐकेकाळची श्रीमंत महानगरपालिका आज आर्थिकदृष्टया डबघाईस आलेली आहे. त्यामुळे मनपा वेगवेगळे उत्पन्नाचे स्त्रोत शोधत आहे. तर दुसरीकडे खाजगी मोबाईल कंपन्यांकडील मोबाईल टॉवरच्या मिळकत कराची करोडो रुपयांची थकबाकी असूनही त्यांच्यावर कुठलीच कडक कारवाई करण्यात येत नाही. यामध्ये काही आर्थिक देवाण-घेवाण आहे काय ? याची शंका येते.

 दरम्यान, खाजगी मोबाईल कंपन्याकडील थकीत मोबाईल टॉवरची थकबाकी माहे मार्च महिन्यात पूर्ण वसूल करण्यात यावी. अन्यथा प्रशासन प्रमूख म्हणून आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून   माहे एप्रिलपासून सदर थकबाकीची रक्कम आपल्या वेतनातून कपात करण्यात यावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button