breaking-newsराष्ट्रिय

मोदींना आव्हान देणारे तेज बहादूर हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात लढवणार निवडणूक

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी जननायक जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. पक्षातर्फे सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) दलाचे निलंबित जवान तेज बहादुर यादव यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या विरोधात ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

हरयाणा विधानसभेसाठी तेज बहादुर हे करनाल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. याआधीही ते लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता. त्यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर शालिनी यादव यांना मोदींच्या विरोधात रिंगणात उभे केले होते. तर तेजबहादूर यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. तेजबहादूर यांच्या उमेदवारी अर्जातील विसंगती आणि त्रुटींमुळे निवडणूक आयोगाने अर्ज बाद केला होता.

दरम्यान, महाराष्ट्रासह हरयाणामध्ये विधानसभा निवडणुक होत आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ४ ऑक्टोबर असून, मतमोजणीनंतर अंतिम निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button