breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

आता सॅमसंगच्या स्मार्टफोनसोबत मिळणार नाही चार्जर

सॅमसंगच्या एका निर्णयामुळे ग्राहकांना जास्तच धक्का बसणार आहे. या स्मार्टफोनसोबत मिळणारा चार्जर न देण्याचा निर्णय घेण्याबद्दल सॅमसंगकडून विचार सुरू आहे. त्यामुळे सॅमसंगच्या नव्या मोबाईलसोबत चार्जर न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सॅममोबाईलनं दिलेल्या वृत्तानुसार पुढील वर्षापासून काही स्मार्टफोनसोबत चार्जर न देण्याची योजना सॅमसंगकडून आखली जात आहे. सॅमसंगनं असा निर्णय घेतल्यास पहिल्यांदाच कंपनीचे फोन चार्जरशिवाय विकले जातील. यामागील विचार पूर्णपणे आर्थिक असल्याचं बोललं जात आहे. सॅमसंग जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी दरवर्षी कोट्यवधी फोन्सची विक्री करते. या फोनसोबत चार्जर न दिल्यास कंपनीला आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे फोनची किंमत कमी होईल त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांनाही होणारच आहे…असा विचार कंपनीकडून सुरू आहे.

सध्या जगभरात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सचे चार्जिंग पोर्ट्स जवळपास सारखेच असतात. सगळ्याच कंपन्या यूएसबी-सी पोर्ट चार्जिंग पोर्ट्सचे फोन तयार करतात. सॅमसंग याच मुद्द्याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. चार्जरशिवाय फोन विकण्याच्या विचारात असलेली सॅमसंग ही पहिली कंपनी नाही. ऍपलकडूनही आयफोन १२ ची सीरिज चार्जरशिवाय बाजारात लॉन्च करण्याबद्दल विचार सुरू आहे.

फोनसोबत चार्जर न दिल्यानं ग्राहकांची एकीकडे निराशा होणार असली, तरी त्यामुळे फोनची किंमत कमी होणार असल्यानं ग्राहकांना दिलासाही मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button