मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा ; अन्यथा आयुक्तांच्या बंगल्यात सोडेन – सुलभा उबाळे
पिंपरी – निगडीसह यमुनानगर परिसरात मोकाट कुत्री बसलेली असतात. रस्त्यावरुन जाणा-या नागरिकांवर हल्ला करत आहेत. मोकाट कुत्र्यावर कारवाई करा, अन्यथा आयुक्तांच्या बंगल्यास कुत्रे सोडू, अशी मागणी शिवसेना शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे सुलभा उबाळे, शाखा प्रमुख गणेश इंगवले, उपविभागप्रमुख सतिष मरळ यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, रंजना शामराव गोलांडे यांच्यावर गुरुवारी (दि.10) कुत्र्याच्या टोळीने हल्ला करुन त्यांना जखमी केले आहे. यापूर्वी वारंवार तक्रार करुनही अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही. संपूर्ण यमुनानगर भागातील नागरिक व लहान मुले यामुळे त्रस्त झाली आहे. सारथी हेल्पलाईनवर सुध्दा या संदर्भात तक्रार नोंदविली आहे. तरी मोकाट कुत्र्यांना पकडण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना द्यावेत. अन्यथा मोकाट कुत्रीच आयुक्तांच्या बंगल्यात सोडण्यात येतील, असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.