breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मैं समदंर हूँ, म्हणणा-या विरोधी पक्षनेते फडणवीसाना मिळाला ‘सागर’ बंगला

मुंबई – देवेंद्र फडणवीसांचे सरकार गेल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत 28 नोव्हेंबरला पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळाच्या सत्ता स्थापनेनंतर आता मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप सुरु झाले आहे.

सध्या चार मंत्र्यांना बंगले मिळाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगला मिळाला आहे. तर छगन भुजबळ यांच्या वाटेला नकोसा असलेला रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन बंगला मिळाला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगला मिळाला आहे. मैं समदंर हूँ, लौटकर जरुर आऊंगा… म्हणत पुन्हा सत्तेत येण्याचा नारा देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना ‘सागर’ हा बंगला मंजूर झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button