breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मेट्रोच्या नावात पिंपरीचा उल्लेख नसल्यानं महापौर उषा ढोरे नाराज…

पुणे | महाईन्यूज |

पिंपरीत मेट्रो डब्यांच्या पूजनावेळी मानआपमानाचे चित्र पहायला मिळाले. नागपूरहून पुणे मेट्रोचे कोचेस आज पिंपरीत दाखल झाले. या मेट्रोच्या नावातच पिंपरीचा उल्लेख नसल्यानं पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे संतापल्या. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास मेट्रो चाचणी होऊ न देण्याचा महापौरांनी इशारा दिला आहे.

नागपूरहून पुणे मेट्रोचे कोचेस आज पिंपरीत दाखल झाले. त्यावेळी कोचेसवरील कागद न हटवताच महापौर उषा ढोरे यांना पूजन करायला सांगितले. मात्र, याबाबत महापौरांना कोणतीच कल्पना नसल्यानं त्यांचा गोंधळ उडाला. सोबतच मेट्रोच्या नावात पिंपरीचा उल्लेख नसल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर मेट्रो प्रशासनानं समाधानकारक उत्तरं दिली नाही, तर मेट्रोची चाचणीच होऊ देणार नाही, असा इशारा महापौरांनी दिला आहे. या सर्व प्रकारात महापौरांना तासभर ताटकळत उभं राहावं लागलं, त्यामुळे त्या चांगल्याच संतापल्या.

लवकरच पुणेकरांच्या सेवेत मेट्रो दाखल होणार आहे. दरम्यान, पुणे मेट्रोचे काम सध्या वेगात सुरू असून या मेट्रोची आता प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. मेट्रोची प्रत्येक गाडी ही तीन कोचची असून एका गाडीतून 950 ते 970 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात.

तीन कोचपैकी एक कोच महिलांसाठी राखीव असून तीनही कोच आतून एकमेकांना जोडलेले असल्यामुळे प्रवाशांना सहज एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाणे शक्य होणार आहे. स्टेनलेस स्टीलने बनवलेले हे कोच वजनाला हलके असून यामध्ये अत्याधुनिक एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. बाहेरील प्रकाशानुसार या दिव्यांची तीव्रता कमी-अधिक करणारी यंत्रणाही यात बसवण्यात आली आहे. ताशी कमाल 90 किमी वेगाने धावू शकणाऱ्या या गाडीच्या कोचमध्ये प्रवाशांसाठी मोबाइल व लॅपटॉप चार्जिंग सुविधा पुरवण्यात आली असून दृकश्राव्य संदेशप्रणाली असणार आहे. हे कोच लवकरच मेट्रोच्या उन्नत मार्गावर चढवण्यात येतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष गाडी धावण्याच्या चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button