breaking-newsमहाराष्ट्र

मुले पळवणारी टोळी समजून भावाचा फोटो शेअर

नाशिक – राज्यात आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी समजून अनेक मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. मात्र सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या अफवांमुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. असे असतानाच नाशिकमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे.

नाशिकमध्ये चक्क मस्करीतून मुलं पळविणारा इसम म्हणून भावाचाच फोटो शेअर करत अफवा पसरल्या. याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलायं.

“नाशिकमध्ये मुलं पळविणारी टोळी कार्यरत असून आपल्या मुलांना सांभाळा. फोटोत दिसणारे कुठे दिसले तर थेट पोलिसांशी संम्पर्क साधा” असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आल होते. मात्र या अफवेत ज्याचा फोटो व्हायरल झाला त्या अफजल हैदर मुलतानी याने नाशिक पोलिसात या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

हैदरने ही तक्रार आपला चुलत भाऊ गुलाम रसूल मूलतानी याच्यावर दाखल केली आहे. हैदरच्या तक्रारीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले असता चेष्टा मस्करीतुन फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याची कबुली आरोपीने दिली.

मात्र हे मेसेज वाचल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील सुशिक्षित मंडळींनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे. असा खोडसाळपणा जीवावर बेतू शकतो अश्या शक्यतेनेच पोलीसांनी सतर्कतेच्या दृष्टीने सर्व पाऊल उचलले आहे.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button