breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुलीने दिवसभर शेतात ट्रक्टरद्वारे केली दीड एकर कांदा पेरणी, सावित्रीबाईंना जयंतीनिमित्त केले अभिवादन!

सोलापूर|महाईन्यूज|प्रतिनिधी

शिरापूर (ता.मोहोळ) येथील शेतकरी उमेश गोविंदराव राजेपांढरे यांची बारावी इय्यतोत शिक्षण घेत असलेली कन्या सानिका हिने हे आगळे वेगळे अभिवादन केले आहे. सानिका ही सोलापूर येथील एका महाविद्यालयात 12 वी कॉमर्स शाखेत शिक्षण घेत असून ती सुट्टीच्या दिवशी शेतात आपल्या वडिलांना शेती कामात मदत करत असते.

ती घरच्या शेतात स्वतः ट्रक्टरने नांगरणी कुळवणी, सरी सोडने, फळ बाग लागवड़ी साठी भोद सोडने आदी कामे करते. तिच्या वडिलांनी तिला ही सर्व शेती कामे शिकविली असून ती आता या कामात तरबेज झाली आहे. सानिकाने घरच्या शेतात सावित्रीबाई फुले जयंती दिनी दिवसभर दीड एकर कांदा पेरणी करत अनोखे अभिवादन केले. तिच्या या अनोख्या अभिवादनाची चर्चा मोहोळ तालुक्यात सुरु असून तिचे कौतुक होत आहे.

आपल्या ग्रामीण भागात मुलेच शेती यशस्वी करत असल्याचे दिसून येते. पण मला मुलीने शेती यशस्वी केली हे ऐकायचे आहे. अनेक क्षेत्रात मुली बाजी मारत आहेत. मात्र मला शेतीत एक यशस्वी कृषीकन्या म्हणून नाव कमवायचे आहे असे सानिका म्हणते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button