breaking-newsपुणे

मुलीचे कोरोनाने निधन; डीएसके काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार

पुणे – सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी उर्फ डीएसके यांना कन्येच्या अंत्यविधीसाठी रविवारी काही काळासाठी तुरुंगाबाहेर पाठविले जाणार आहे.

यांची मुलगी अश्‍विनी देशपांडे यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. कोरोनाच्या संसर्गानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलीच्या तेराव्याचे विधी करण्यासाठी डी. एस. कुलकर्णी यांच्यासह पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांना न्यायालयाने काही तासांसाठी तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांच्या आदेशानुसार कुलकर्णी यांना रविवारी (16 ऑगस्ट) रोजी काही वेळासाठी तुरुंगातून बाहेर सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, ज्यादा व्याजाचे अमिष दाखवून राज्यातील हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप डीएसके ग्रुपवर आहे. अनेक ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर गुंतवणूकदारांची दोन हजार कोटी रुपयांना फसवणूक केल्याच्या प्रकरणात डीएसके यांच्यासह पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष, मेहुणी, जावई आणि इतर सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button