breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

मुलगा झाल्याच्या आनंदात गावभर पेढे, पित्याला कोरोना, 116 जण क्वारंटाईन

नांदेड : मुलाच्या जन्माचा उत्सव साजरा करणाऱ्या नांदेडमधील पित्याच्या आनंदावर अवघ्या काही दिवसात विरजण पडलं. पित्याला कोरोनाची लागण झाली, तर त्याने वाटलेले पेढे खाणाऱ्या तब्बल 116 जणांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे.

मुलगा झाल्याच्या आनंदात 24 वर्षीय तरुणाने गावात पेढे वाटले. मात्र त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने पेढे खाणाऱ्या 116 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील काटकळंबा गावात ही घटना घडली. तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने गावाची अक्षरशः झोप उडाली आहे.

प्रशासकीय यंत्रणेने आता खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील केला आहे. गावात आरोग्य कर्मचारी पथक, पोलीस, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यासह सामाजिक टीमचा राबता वाढला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button