breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अत्यावश्यक विभाग वगळून पिंपरी महापालिका कर्मचा-यांना पाच दिवसाचा आठवडा लागू?

महापालिका आयुक्तांकडे प्रशासनाने ठेवला प्रस्ताव, कर्मचारी महासंघाच्या मागणीला यश

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अत्यावश्यक विभागांना वगळून अन्य विभागातील अधिकारी-कर्मचा-यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार करुन मान्यतेसाठी आयुक्तांकडे मंजुरीला ठेवला आहे. त्यामुळे 29 फेब्रुवारीपासून पालिकेच्या कर्मचा-यांनाही पाच दिवसाच्या आठवड्याची अमंलबजावणी करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी व कर्मचा-यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, अशी मागणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्या मागणी यश मिळाल्याचे दिसत आहे.

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून अत्यावश्यक सेवासाठी पाच दिवसांचा आठवडा नसणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीने हा महत्वाचा निर्णय घेतला असून राज्य कर्मचाऱ्यांनी केलेली पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे.

राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून ५ दिवसांचा आठवडा करावा हा प्रस्ताव विचाराधीन होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला. मात्र, अत्यावश्यक सेवांसाठी मात्र पाच दिवसांचा आठवडा असणार नाही. त्यानूसार पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या मागणीने तशी अमंलबजावणी प्रशासनाने सुरु केली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य, अग्नीशामक, सुरक्षा, पाणीपुरवठा, जनसंपर्क, शिक्षण, विद्युत या विभागातील कर्मचा-यांना पाच दिवसाचा आठवडा लागू होणार नाही. त्या कर्मचा-यांना पुर्वीप्रमाणेच सकाळी 10 ते संध्याकाळी 5.45 वाजेपर्यंत कामकाज असणार आहे. तर महापालिकेच्या अन्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना कार्यालयीन वेळेत बदल केला आहे. त्यांना सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 वाजेपर्यंत वेळ असणार आहे. सदरील प्रस्ताव आयुक्तांकडे ठेवला असून लवकरच त्यावर सही होवून त्यांची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका कर्मचा-यांना देखील दिलासा मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button