TOP Newsपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकून मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या दिशेने चप्पल फेकून मारली. ही घटना रविवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पूर्णानगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय संभाजी पाताडे (वय 49, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी रविवारी (दि. 6) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर्णानगर, चिंचवड येथे श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पर्यटन केंद्राचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा रविवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांची गाडी कार्यक्रम स्थळी मुख्य प्रवेशद्वारावर आली असता एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर चप्पल फेकून मारली. ती चप्पल फडणवीस यांच्या गाडीवरून दुस-या दिशेने जाऊन पडली. याबाबत अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button