breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा शनिवारी विश्वासदर्शक ठराव

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव उद्याच मांडण्याची शक्यता आहे. त्यासाठी उद्याच विधानसभेचे विशेष अधिवेशन भरवण्याची शक्यता आहे. सर्व आमदारांचा २७ तारखेला शपथविधी झाला आहे. त्यामुळे आता केवळ विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया बाकी आहे.

नव्या ठाकरे सरकारसाठी बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्याआधी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सर्व पक्षांचे आमदार गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच आहेत. त्यामुळे त्यांना लवकर मोकळे करता यावे यासाठी उद्याच ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा नव्या सरकाचा प्रयत्न आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button