breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुकेश अंबानी जगातील सातवे सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुंबई | भारतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी आता संपूर्ण जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणार आहेत. त्यांनी बर्कशायर हॅथवेच्या वॉरेन बफेट, गूगलचे लॅरी पेज आणि Serge Brin यांना मागे टाकले आहे. जगभरातील टॉप-10 श्रीमतांच्या यादीत संपूर्ण आशिया खंडातील एकमेव नावाचा समावेश झाला आहे. ते नाव म्हणजे, मुकेश अंबानी यांचं.

फोर्ब्स मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 70 अब्ज डॉलर एवढी आहे. 20 जून रोजी मुकेश अंबानी फोर्ब्सच्या लिस्टमध्ये नवव्या स्थानी होते. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती 64.5 अब्ज डॉलर एवढी होती. फक्त 20 दिवसांत त्यांची संपत्ती 5.4 अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचा मार्केट कँप 12 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर रॅकिंग्समध्ये संपत्तीचं मूल्यांकन शेअर्सच्या किमतींच्या आधारावर ठरवण्यात येतं. हे दर पाच मिनिटांनी अपडेट होतं. रिलायन् इंडस्ट्रीजमध्ये अंबानी यांचे शेअर 42 टक्के आहेत. आज शेअर्समध्ये जवळपास 3 टक्क्यांनी वाढले आहेत. याचे शेअर्सनी 52 आठवड्यांतील उच्चांक गाठला आहे. आज हे शेअर्स 1878.50 रुपयांवर बंद झाला. तर 52 सप्ताहांचा उच्चांकांचा 1884.40 रूपये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button