breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई | मुंबईत कोरोनाबाबत सर्वात चांगली कामगिरी असणाऱ्या वांद्रे पूर्व-खार येथील एच ईस्ट वॉर्डच्या ऑफिसरचा मृत्यू झाला आहे. एच ईस्ट वॉर्डचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार ( वय 57 वर्ष) यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशोक खैरनार यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातीला त्यांच्यावर वांद्रे येथील गुरुनानक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

रेमडेसिवीर, प्लाझ्मा थेरपीनंही त्यांच्यावर उपचार झाले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना काल (शुक्रवार) फोर्टीस रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला आहे. थोड्याच वेळात शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांचा मृतदेह नेण्यात येईल. दुर्देव म्हणजे मुंबईत सर्वात कमी ग्रोथ रेट त्यांच्या एच ईस्ट वॉर्डाचा होता. रुग्णसंख्या वाढीचा दर रोखण्यात तसेच डबलिंग रेट वाढवण्यात त्यांना यश आलं होतं. मात्र कोरोनाने त्यांना गाठलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button