breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई-पुणे-मुंबई प्रवास आता 20 मिनिटांत ; पुणेकरांच्या भेटीला हेलिकॉप्टर टॅक्सी

मुंबई –  मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी हेलिकॉप्टर टॅक्सी सेवा सुरू होत आहे. त्यामुळे अवघ्या 20 मिनिटांत आता मुंबईहून पुण्याला पोहोचता येणार आहे.

अमेरिकेतील फ्लाय बेड नावाच्या हॅलिकॉप्टर सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. मुंबईहून पुण्यासह, शिर्डी आणि इतर जवळील ठिकाणांवरही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी, कंपनीने भारतातील एका कंपनीसोबत करार केला असून ब्लेड इंडिया नावाने नवीन कंपनी सुरू केली आहे. मुंबईतील जुहू आणि महालक्ष्मी परिसरातून हे हॅलिकॉप्टर उड्डाण घेईल. त्यानंतर, केवळ 20 मिनिटांत ते हेलिकॉप्टर पुण्यात पोहोचेल.

ब्लेड इंडिया अॅपद्वारे प्रवाशांना या सेवेचे बुकींग करता येणार आहे. सध्या या प्रवासाचा दर निश्चित करण्यात आला नाही. मात्र, लवकरच याबाबत संबंधित कंपनीच्या अॅप आणि वेबसाईटवरुन भाड्यासंदर्भात माहिती देण्यात येईल. विशेष म्हणजे खासगी जेटपेक्षा या हेलिकॉप्ट टॅक्सीचे भाडे खूप कमी असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीस वीकेंडला लक्ष्य ठेवून या हेलिकॉप्टर फेऱ्यांची सेवा पुरविण्यात येणार आहे.

दरम्यान, यापूर्वी बंगळुरुमध्ये विमानप्रवाशांसाठी प्रथमच हेलिकॉप्टर टॅक्सी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रवाशांना 15 मिनिटांमध्ये विमानतळावरुन घरी जाण्यासाठी व तेथून घरी येणे शक्य बनले आहे. त्याच धर्तीवर मुंबई-पुणे आणि पुणे मुंबई वाहतूक सेवांचा वाढता अंदाज घेऊन ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button