breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘मुंबई टू गोवा’ सफर अनुभवा आता अलिशान ‘क्रूझ’मधून!

मुंबई : सर्व बाजूंनी निळाशार समुद्र, उसळणा-या लाटा आणि गारेगार वारा…अशा धुंद वातावरणात मुंबईकरांना ‘मुंबई टू गोवा’ प्रवास करता येणार आहे. बहुप्रतिक्षेत असलेली ‘आंग्रिया’ ही मुंबई ते गोवा क्रूझ सेवा शनिवारपासून सुरू झाली. भाऊचा धक्का येथून ही क्रूझ निघाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या क्रूझ सेवेला झेंडा दाखवला. ‘आंग्रिया सी इगल कंपनी’ आणि ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’द्वारे ही क्रूझ सेवा सुरु करण्यात आली आहे.

मुंबई ते गोवा आपण गाडीने, रेल्वेने तसेच विमानाने नेहमीच जातो. पण मुंबई ते गोवा हा प्रवास मुंबईकरांना आता समुद्रमार्गाने क्रूझने करता येणार आहे. जपानमध्ये बनवलेल्या या क्रूझचं नाव मराठा सरदार कान्होजी आंग्रेंच्या नावावरुन ‘आंग्रिया’ ठेवण्यात आले आहे. या क्रूझ सेवेचा दिमाखदार उदघाटन सोहळा भाऊचा धक्का येथे पार पडला. मुंबईहून सायंकाळी ५ वाजता रवाना झालेली क्रूझ दुस-या दिवशी सकाळी ९ वाजता गोव्याला पोहचेल. ही सेवा एक दिवसाआड सुरू असेल. या अनोख्या प्रवासात प्रवाशांना मार्गदर्शकांची साथही लाभणार आहे. मुंबईत ही क्रूझ ‘भाऊचा धक्का’ येथे थांबणार आहे.

काय आहेत क्रूझवर सुविधा?

क्रूझवर जवळपास ८ रेस्टॉरंट्स, बार, कॉफी शॉप, स्विमिंग पूल, मिनी गोल्फ क्लब, क्लब असं बरंच काही अनुभवता येणार आहे. क्रूझमध्ये जवळपास ३५० प्रवासी प्रवास करू शकतात. या आलिशान प्रवासासाठी प्रवाशांना ४ ते १२ हजार रूपये मोजावे लागतील. क्रूझमधील प्रत्येक खोली खास जपानी शैलीत सजवण्यात आली आहे. या जलप्रवासात प्रवाशांना उत्तम जेवण, अल्पोपाहार आणि मनोरंजनाची मेजवानी मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button