breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus:अम्फाननंतर ओडिशात पुन्हा कोरोनाचे 24 तासात 86 रुग्ण वाढले

मुंबई : अम्फानच्या वादळानंतर आता ओडिशामध्ये कोरोनाने कहर सुरू केला आहे. शुक्रवारी 86 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आता राज्यात एकूण रुग्णांची संख्या 1189 वर पोहोचली आहे. त्यापैकी 90 टक्के कामगार बाहेरून परतलेले आहेत. कामगार परत येण्यापूर्वी राज्यात कोरोनाचे २०० रुग्ण होते. पण जसे जसे इतर राज्यातू रुग्ण येत आहेत तसे तसे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

3 मेपासून 3 लाखाहून अधिक जण ओडिशाला परतले आहेत. प्रवासी रेल्वे, बस आणि इतर वाहनांद्वारे ते राज्यात परतत आहेत. राज्यातील 6798 पंचायतींमध्ये 15,892 तात्पुरती वैद्यकीय केंद्रे उभारली गेली आहेत. या सर्व केंद्रांमध्ये 7,02,900 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्व स्थलांतरित मजुरांना गावाच्या बाहेर कोरंटाईन केलं जात आहे. गेल्या 24 तासांत 86 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 80 रुग्ण क्वारंटाईन केंद्रामध्ये थांबले आहेत, तर कंटेनमेंट झोनमध्ये एक रुग्ण वाढला आहे. या व्यतिरिक्त, 5 स्थानिकांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे.

जाजपूर जिल्ह्यात 86 पैकी 46 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 37 पश्चिम बंगाल, 1 तेलंगणा, 2 तामिळनाडू, 4 यूएई, 1 छत्तीसगड आणि 1 हरियाणा येथून परत आलेल्यांपैकी आहे.

या व्यतिरिक्त कटकमध्ये 11, गंजाममध्ये 5, बालासोरमध्ये 5, भद्रकमध्ये 3, क्योंझरमध्ये 3, खोरधामध्ये 3, पुरीमध्ये 3, सुंदरगड जिल्ह्यात एक रुग्ण वाढला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button