breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई एपीएमसीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचा डंका, बारामतीचे जावई बिनविरोध

नवी मुंबई | मुंबई एपीएमसीच्या सभापतीपदी अशोक डक तर उपसभापतीपदी धनंजय वाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मराठवाडा महसूल विभागाचे अशोक डक यांना सभापतीपद मिळाले. तर पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय वाडकर यांना उपसभापतीपद बिनविरोधपणे देण्यात आले.

एपीएमसी सभापती निवडणूक महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची समजली जात होती. महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व एपीएमसीवर प्रस्थापित झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता, तर भाजपला खातंही उघडता आलेलं नव्हतं.

सहा महसूल आणि चार व्यापारी मतदारसंघात भाजपला एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने महाविकास आघाडीने एपीएमसीवर निर्विवाद वर्चस्व ठेवलं होतं. राज्यातला महाविकास आघाडीचा प्रयोग एपीएमसीमध्येही यशस्वी झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना यांनी आपले पॅनल बनवले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button