ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

15 टक्के फी सवलतीच्या आदेशाची पायमल्ली करणा-या शाळांवर प्रशासक नेमा- भापकर

पिंपरी चिंचवड | राज्य सरकारने सर्व खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के सवलत देण्याच्या निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व खासगी शाळांनी त्याची अंमलबजावणी करावी. त्याबाबत महापालिका प्रशासनाने शाळांना आदेश द्यावेत. ज्या शाळा शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करतील. त्या शाळेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेतील कुठल्याही सुविधा वापरल्या नसताना सर्व शाळांकडून 100% फि वसुलीचा तगादा लावलेला आहे. फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांचा विचार न करता त्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवणे, विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला न देणे, निकालपत्र न देणे, फी साठी तगादा लावणे, टप्प्याटप्प्याने फी घेण्यास नकार देणे आदी गंभीर प्रकार देखील झालेले आहेत. आजही काही मुजोर शाळा करीत आहेत.

राज्य सरकारने 15 टक्के फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास काही मुजोर शाळा विरोध करण्याची तयारी करत आहेत. शहरातील सर्व खासगी शाळांनी विद्यार्थ्यांच्या फी मध्ये 15 टक्के सवलत देण्याच्या शासनाच्या निर्णयाची 100% अंमलबजावणी बाबत सर्व शाळांना सक्त ताकीद द्यावी. ज्या शाळा शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करतील. त्या शाळेवर प्रशासक नेमण्यात येईल. अशा आशयाची नोटीस बजावून जी शाळा शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही. त्या शाळेवर खरोखरच तातडीने प्रशासक नेमून त्या शाळा प्रशासनाने ताब्यात घेऊन फी माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button