breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत २,३५२, पुण्यात २,६५६ नवे रुग्ण! महाराष्ट्राने १४ लाखांचा टप्पा ओलांडला

मुंबई | देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. गुरुवारी आढळलेल्या 16 हजार 476 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 14 लाख 922 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 394 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 37 हजार 56 इतका झाला आहे.

तसेच एका दिवसात 16 हजार 104 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 11 लाख 4 हजार 426 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 2 लाख 59 हजार 6 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 2 हजार 352 नवे रुग्ण आढळले, तर 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 7 हजार 620 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8 हजार 972 इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत 1 लाख 70 हजार 678 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 27 हजार 435 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनाच्या 2 हजार 656 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 69 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 86 हजार 677 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 6 हजार 598 इतका झाला आहे. तसेच गुरुवारी आढळलेल्या 2 हजार 656 नव्या रुग्णांपैकी 1 हजार 36 रुग्ण पुणे शहरातील असून 633 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहराची एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 46 हजार 327 इतकी झाली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 78 हजार 714 वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button