breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

सचिन पायलट दिल्लीत दाखल, प्रियंका गांधी करणार मनधरणी?

नवी दिल्ली – मु्ख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराजी व्यक्त करत सचिन पायलट यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आलं. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार आणि दिेलेली आश्वासनं पूर्ण न झाल्याने सचिन पायलट पुन्हा एकदा नाराज झाले असून त्यांचा गट सक्रीय झाला आहे. सध्या सचिन पायलट दिल्लीत दाखल झाले असून प्रियंका गांधी त्यांनी मनधरणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सचिन पायलट भाजपच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, या वृत्ताचं खंडन खुद्द सचिन पायलट यांनीच केलं आहे. त्यानंतर ते दिल्लीत दाखल झाले आहेत. राजस्थान काँग्रेसमध्ये गेहलोत विरुद्ध पायलट असा अंतर्गत संघर्ष असून, हा संघर्ष गेल्या काही महिन्यात दुसऱ्यांदा उफाळून येताना दिसत आहे. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये असाच संघर्ष बघायला मिळाला होता. मात्र, हे बंड शमवण्यात काँग्रेसला यश आलं होतं. गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करून त्यात आपल्या निष्ठावंताना संधी दिली जावी, अशी मागणी पायलट यांच्याकडून केली जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर नियुक्त्यांना विलंब होत असल्यानं पायलट गटाने नाराजीचा सूर लावला आहे.

काँग्रेस नेते संपर्कात… प्रियांका गांधी करणार मध्यस्थी

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा हुकमी एक्का असलेले जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सचिन पायलटही भाजपमध्ये जाणार असल्याचं वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरलं होतं. भाजपाच्या उत्तर प्रदेशातील नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी पायलट लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांचं विधान पायलट यांनी फेटाळून लावलं आहे. त्यानंतर पायलट हे अचानक दिल्लीत दाखल झाले. शुक्रवारी रात्री पायलट दिल्लीत पोहोचले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पायलट यांच्या संपर्कात असून, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या राजस्थानातील राजकीय तिढा सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचं माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे सचिन पायलट आणि त्यांच्या गटाची नाराजी दूर करण्यात प्रियांका गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रयत्नांना किती दिवसात यश येणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button