breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादी युवकचा पुण्यातील ‘एम्प्लॉयमेंट ऑफिसवर मोर्चा

पिंपरी, (महाईन्यूज) – मागील पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. उद्योग व रोजगारात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. राज्य सरकारच्या मुद्रा योजनेसारख्या अनेक योजना फसव्या ठरल्या आहेत. यामुळे तरुणांच्या बेरोजगारीत वाढ होत आहे. त्याच्या निषेधार्थ पुणे व पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली.

हा मोर्चा गुरुवारी (दि. 19) दुपारी बारा वाजता पुण्यातील रास्ता पेठ येथील जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर (एम्प्लॉयमेंट ऑफिस) काढण्यात येणार आहे. चिंचवड येथे सोमवारी (17 जून) युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निरीक्षक निशांत वाघमारे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक विशाल काळभोर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस संदीप चिंचवडे, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष शेखर काटे, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष शाम जगताप, राष्ट्रवादीचे सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button