breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत कोरोना नंतर आता मलेरियाच्या घटनांमध्येही वाढ

देशभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच प्रमाण सर्वात जास्त आहे आणि महराष्ट्रात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत…मात्र कोरोना नंतर आता मुंबईत मलेरियाच्या घटनांमध्येही गेल्या वर्षापेक्षा या वर्षात किरकोळ वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे. याबाबत मुंबई महापालिकेने माहिती दिली… जुन महिन्यात मलेरियाची 328 प्रकरणे समोर आली आहे. जी गेल्या वर्षात याच काळात 313 होती. तसेच चार डेंग्यूची प्रकरणे आणि एक लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण जून महिन्यात आढळले आहेत. तर 2019 मध्ये जुन महिन्यातच आठ डेंग्यू आणि पाच लेप्टोस्पायरोसिसरचे रुग्ण आढळून आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

वरळीतील जी साउथ, भायखळातील ई वॉर्ड आणि परेल मधील एफ वॉर्डमध्ये सर्वाधिक मलेरियाचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या भागात मोठ्या संख्यने डासांची उत्पत्ती होत असून खासकरुन मिल्स किंवा तुरुंग, चाळ आणि रेल्वेच्या कार शेड येथे आढळून येतात.

महापालिकेच्या साथीरोग विभागाने दादर- माहिम मधील जी नॉर्थ येथे डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसचा संभाव्य धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच माटुंगा मधील एफ नॉर्थ आणि जी साउथ येथे मोठ्या प्रमाणात डेंग्यू आढळून येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button