breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत कावळे, कबुतरांच्या मृत्यूत वाढ; बर्ड फ्लूची भीती कायम

मुंबई – मुंबईत बर्ड फ्लूविषयी उलटसुलट चर्चा सुरू असताना मुंबईत विविध भागात बुधवारी सकाळपर्यंत १६९ कावळे, कबुतर मृत्युमुखी पडल्याचे नोंद झाली आहे.मुंबईत मंगळवारी सकाळी ७ ते बुधवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सुमारे १६९ पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. रविवार, सोमवारपाठोपाठ मंगळवार, बुधवारीही काही कावळे, कबुतरे मृत पावले आहेत.

वाचा :-पत्नीला मिठी मारून लोकलमधून फेकले, हार्बर रेल्वेवरची घटना

पालिकेने शहरात पक्षी कुठेही मृत आढळल्याचे दिसताच पालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यानुसार, मुंबईकरांनीही त्यास प्रतिसाद देत त्याबाबतची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या १०१६ क्रमांकावर कळविण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी चेंबूर, गोवंडी, प्रभादेवी, वडाळा, माटुंगा, कुलाबा, सायन कांदिवली, बोरीवली, अंधेरी, मालाड, दादर आदी परिसरात कावळे, कबुतरे मृत स्थितीत आढळले होते. त्यात कावळ्यांचे प्रमाण सर्वाधिक ठरले आहे. या तक्रारीबाबत माहिती देवनार येथील पशुवधगृहात पाठवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button