breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील सँडहर्स्ट रोड स्टेशनवर स्लो ट्रॅकवर भिंत कोसळली

मुंबईतील सँडहर्स्ट रोड स्टेशनच्या स्लो ट्रॅकवर भिंत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे ही भिंत रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याचे समजते आहे. सँडहर्स्ट रोड हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येतानाचे एक स्टेशन आहे. भायखळा आणि मशिद बंदर या दोन स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेचे हे स्थानक आहे. या स्थानकाच्या धीम्या लोकल मार्गावर भिंत कोसळल्याने धीम्या गतीच्या गाड्यांची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून मुंबईत तुफान पाऊस पडतो आहे. रविवारी रात्रीही पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसून आला. अशात मुंबईतील हिंदमाता, परळ टीटी, मिलन सबवे या ठिकाणी पाणी साठले होते. तसेच अनेक सखल भागांमध्येही पाणी साठले होते. काही वेळापूर्वीच सँडहर्स्ट रोड स्थानकातील स्लो ट्रॅकवर भिंत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. भिंतीचा हा ढिगारा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र तोवर धीम्या लोकल्सची वाहतूक जलद मार्गावर वळण्यात आली आहे. ‘फ्री प्रेस जरनल’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button