breaking-newsआंतरराष्टीय

इंडोनेशियामध्ये बोट उलटून 178 जण बेपत्ता

सिमालूनगून (इंडोनेशिया) – इंडोनेशियामध्ये एका विशाल तलावात प्रवासी वाहतुक करणारी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 180 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्‍त होत आहे. या बोटीवर नक्की किती जण होते, हे माहित नसल्यामुळे मरण पावलेल्यांचा आकडा अजूनही निश्‍चित झालेला नाही. प्राथमिक अंदाजापेक्षा तिपटीने हा आकडा जास्त असल्याचे चौकशीनंतर स्पष्ट होत आहे.

सुमात्राच्या लेक टोबा या पर्यटनस्थळाजवळ ही बोट सोमवारी बुडाली होती. बुडालेल्या व्यक्‍तींच्या शोधासाठी या तळामध्ये इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रयत्न सुरू केले गेले आहेत. बोटीमध्ये सुमारे 80 जण होते. तर काही जण मोटरसायकली घेऊन बोटीत चढले होते. त्यामुळेच ही बोट उलटली आणि बुडाली, असे या विभागाने म्हटले आहे. प्रवाशांची अवैध वाहतुक या बोटीतून होत असल्याचे बोलले जात आहे.

या प्रवासी वाहतुकीसाठी कोणतेही स्पष्ट निर्देश किंवा तिकीट आकारणी नव्हती. त्यामुळेच दुर्घटनेतील मृतांबाबत संदिग्धता राहिली आहे. आतापर्यंत केवळ तिघांचे मृतदेह सापडले आहेत तर 18 जणांना वाचवण्यात यश आले आहे. बरेचजण बुडालेल्या बोटेच्या आत अडकून पडले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button