breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मुंबईच्या डबेवाल्यांना आमदार रोहित पवार यांचा मदतीचा हात

मुंबईत लोकल प्रमाणे घडाळ्यातील काट्याच्या वेगाप्रमाणे धावत लोकांना जेवणाचे डब्बे पोहचवणारा म्हणजे ‘मुंबईचा डबेवाला’. मात्र कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे डबेवाल्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशातच आमदार रोहित पवार हे डबेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील डबेवाल्यांसाठी निधी उभा करून दिला आहे. शिवाय इतर नागरिकांनाही डबेवाल्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. “मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे ५ हजार सदस्य असून अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केला आहे. आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर फोटोवरील नंबरवर संपर्क करावा.” असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button