breaking-newsमनोरंजन

मी पाकिस्तानी गायक असतो तर….- सोनू निगम

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याने नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात “जर मी पाकिस्तानी गायक असतो तर, कदाचित मला जास्त ऑफर मिळाल्या असत असं मला वाटतं” असं मत व्यक्त केलं.

त्यावर सोनू निगम ह्याने पाकिस्तानी गायक आणि भारतीय गायकांना मिळणारी प्रसिद्धी आणि वागणुकीबाबत त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. आता भारतीय गायकांना एखादा शो करण्यासाठी म्युझिक कंपन्यांना पैसे द्यावे लागतात. जर पैसे दिले नाहीत तर, संबंधित कंपन्या इतर गायकांना संधी देऊन त्यांना प्रसिद्धी देतील, असं तो म्हणाला. सोनू निगमने म्युझिक कंपन्यांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही कंपन्या पाकिस्तानी गायकांना अशी वागणूक देत नाही. तर मग आपल्या भारतीय गायकांसोबतच असं का नेहमी वागलं जातं, असा प्रश्नही त्याने विचारला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button