breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अद्यापही ‘आरे’तील वृक्षतोड सुरूच, 2 तासात 1800 झाडांची कत्तल

मुंबई | महाईन्यूज | 

आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी आतापर्यंत 2 हजार 600 झाडांपैकी 1 हजार 800 झाडांची अवघ्या दोन दिवसात कत्तल केली आहे. याप्रकरणी जवळपास 29 जणांवर एफआयआर दाखल केलेला असताना सुध्दा ही वृक्षतोड थांबलेली नाही. विशेष म्हणजे झाडे तोडताना तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून कोणालाही आत जाण्यास परवानगी देण्यात येत नाही.

आरे कॉलनी शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांना पोलिसांनी 5 तास ताब्यात घेतले होते. तसेच 29 जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरे कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ अद्यापही पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाचे ओळखपत्रांची तपासणी करुन करुन पोलिस आत सोडत आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका शुक्रवारी (4 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या. आरे मेट्रो कारशेडप्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर रात्रीच्या अंधारात झाडं कापण्यास सुरुवात झाली. झाडं कापण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक पर्यावरण प्रेमी आणि आरे वाचवा याची माहिती मिळताच अनेकांनी कारशेडमध्ये घुसण्याचे प्रयत्न केले. मात्र, पोलिसांनी याला विरोध केला. यामुळे अनेक संतप्त पर्यावरण प्रेमींनी झाडांना मिठी मारत झाड तोडण्यास विरोध दर्शवला.

पर्यावरणप्रेमी झोरु भथेना व ‘वनशक्ती’ स्वयंसेवी संस्थेने कारशेडबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेड आरे कॉलनीमध्येच होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button