breaking-newsमनोरंजन

घाणेरडे कॉमेंट करणाऱ्यांना तापसीचे सडेतोड उत्तर

सोशल मिडीयावर दररोज कोणाला तरी ट्रोल केले जात असते. ट्रोल करणाऱ्यांना विषय कोणताही असला, तरी चालतो. विनाकारण कॉमेंट करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यातही महिलांवर घाणेरडे कॉमेंट करण्यात अनेकांना रस असतो. ग्लॅमरस हिरोईन, ऍक्‍ट्रेसेस, मॉडेल, सेलिब्रिटी वुमनना हमखास ट्रोल केले जात असते. असेच एकदा तापसीलाही ट्रोल करण्याचा प्रयत्न एका नेटकऱ्याने केला, पण हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला.

अकु पांडे नावाच्या नेटकऱ्याने तापसीला टॅग करून घाणेरडे कॉमेंट केले होते. “तापसी मला तुझे अंग आवडते.’ असे तो म्हणाला. त्यावर तापसीने उत्तर दिले. “मलाही माझे अंग आवडते. तुला नक्की काय आवडले ? मला तर सेरेब्रम आवडते.’ असे तापसीने उत्तर दिले. त्यावर “सेरेब्रम’ म्हणजे काय, यावर त्या नेटकऱ्याने सर्च केला असेल. “सेरेब्रम’ म्हणजे मेंदू असे जेंव्हा त्याला उत्तर मिळाले, तेंव्हा त्याची बोलतीच बंद झाली. नेटवर ही चर्चा बघणाऱ्यांनी मात्र या हजरजबीापणाबद्दल तापसीचे तोंडभरून कौतुक केले. अनेकांनी या अकु पांडेला भरपूर शिव्याही घातल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button