मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे यांच्यासह १७ खासदारांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली | संसदेचं लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं असून आता एक धक्कादायक बातमी आली आहे. लोकसभेतील मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे यांच्यासह १७ खासदारांना कोरोनाची लागण झाली होती. रविवारी पाच खासदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. लोकसभेतील खासदारांची कोरोना चाचणी केली होती. काही खासदारांचे काल रिपोर्ट आले तर काहींचे आज. त्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सकाळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात पाच जणांचा रिपोर्ट पाॅजिटीव आला आहे तर अद्याप काही खासदारांचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी होते. ते आता आले असून एकूण १७ खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खबरदारी घेण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.