breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळ लोकसभेच्या “आखाड्यात” आता भाऊसाहेबांची “उडी”

  • संजोग वाघेरे यांची डोकेदुखी वाढणार
  • राष्ट्रवादीपुढे दमदार उमेदवार निवडीचे आव्हान

पिंपरी, (महा ई न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या मावळ मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच पार्थला निवडणूक लढविण्यास नकार असल्याचे समजताच मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणुकीची तयारी करणा-यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मावळातून शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याबरोबर भाऊसाहेब भोईर यांनीही आता निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट केली आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना राष्ट्रवादीपुढे पेच निर्माण होणार आहे.

मुंबई येथे आज शनिवारी (दि. 6) झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. त्यावर मावळातून कितीजण इच्छुक आहेत, याची चर्चा होत असतानाच वाघेरे यांनी चांगली तयारी करत असल्याचे सांगितले. भाऊसाहेब भोईर यांनी देखील पक्षाने उमेदवारी दिल्यास आपणही मावळातून निवडणूक लढवू शकतो, असे स्पष्ट मत मांडले. आता दोन इच्छुक उमेदवार पक्षाकडे आहेत. यातील नेमके कोणाला तिकीट मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. तरी, वाघेरे आणि भोईर यांच्यात समझोता घडवून आणावा लागणार आहे. त्यात अपयश आले तर पक्षाला एकाची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे. कारण, वाघेर यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मावळात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. दहीहंडी, गणेशोत्सव त्यांनी मोठ्या थाटात साजरा केला. आता नवरात्र रासदांडियाचीही जय्यत तयारी केली आहे. एकंदरीत कोणत्या न कोणत्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधून अंदाज जाणून घेण्यासाठी ते मेहनत करीत आहेत.

याउलट भोईर यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्षविली असली तरी त्यासाठी त्यांनी म्हणावी तशी तयारी केलेली नाही. मावळात दोघांचेही नातेसंबंध चांगले आहेत. त्यामुळे त्यांना स्थानिकांची मदत होऊ शकते. मात्र, खास निवडणुकीसाठी वेगळी तयारी भोईर यांनी केलेली दिसत नाही. तथापि, अल्पावधीतच तयारी करून मोर्चेबांधणी करण्याचा त्यांचा आत्मविश्वास वावगा ठरणार नाही, याची काळजी पक्षाला घ्यावी लागणार आहे. भोईर यांच्याकडे स्पष्टवक्तेपणा आणि वक्तृत्वशैलीवरील हातखंडा असला तरी तळागाळातल्या कार्यकर्त्याशी असलेले त्यांचे घनिष्ट संबंध पक्षाच्या हिताचे ठरू शकतात. त्या दृष्टीने पक्षानेतृत्वाला विचार करावा लागणार आहे. तथापि, मावळातून पार्थ अजित पवार हे निवडणूक लढविणार असल्याच्या बातम्या आल्याने या उमेदवारांना धक्काच बसला होता. खरेच पार्थ मावळातून निवडणुकीत उतरल्यास आपले काय होणार, ही चिंता वाघेरे यांना सर्वात जास्त सतावत होती. अखेर त्यावर आज खुद्द शरद पवार यांनी स्पष्टीकरण केल्याने वाघेरे यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button