breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडीतील अनधिकृत भंगार दुकानांवर कारवाई करा

चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात अनाधिकृत स्क्रॅपच्या दुकानामुळे सतत आगीच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये आर्थिक व इतर नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. कुदळवाडीतील आणि पिंपरी चिंचवड शहरातील ही सर्व अनाधिकृत स्क्रॅपची दुकाने यांच्यावर त्वरित कारवाई करून ही अनधिकृत बेकायदेशीर स्क्रॅपची दुकाने हटवण्याची मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली. फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी त्याबाबत निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर अनधिकृत स्क्रॅपची दुकान आहेत. विशेषतः कुदळवाडी या भागामध्ये पाच ते सहा हजार अशी कोणतीही परवानगी नसणारी बेकायदेशीर अनाधिकृत स्क्रॅपची दुकान आहेत. या स्क्रॅपच्या दुकानांमध्ये रात्री प्लास्टिक जाळले जात असल्याच्या घटना घडत आहेत. लोखंड वितळविले जाते. इतर केमिकलयुक्त पदार्थ रात्रभर जाळले जातात. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तसेच या भागात सतत या सर्व गोष्टीमुळे आगी लागतात आणि त्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

हेही वाचा –खासदार बारणे यांच्या ‘हॅटट्रिक’चा खोपोलीतील महायुती कार्यकर्त्यांचा निर्धार

याच भागामध्ये दोन मोठे पेट्रोल पंप आहेत. दुर्दैवाने एखाद्यावेळी आगीच्या घटनेमध्ये हे पेट्रोल पंप देखील बेचिराक होतील आणि अर्धे अधिक शहर या आगीमुळे भस्मसात होईल. त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य ओळखून. ही सर्व स्क्रॅपची अनधिकृत दुकान ताबडतोब काढून टाकावीत आणि या कोणतीही परवानगी नसणाऱ्या अनधिकृत स्क्रॅपच्या दुकानाला आपल्या महानगरपालिकेकडून पुरविले जाणारे पाणी लाईट देखील त्वरित बंद करावे अशी मागणी सांगळे यांनी केली.

आमच्या कुदळवाडी परिसरात या भागामध्ये पाच ते सहा हजार अनाधिकृत कोणतीही परवानगी नसणारी दुकान रहिवासी जागेत उभे आहेत. विशेषतः या अनधिकृत स्क्रॅपच्या दुकानांना महापालिकेकडून पाणी आणि लाईट पुरवली जाते. प्रमाणिकपणे कर भरणाऱ्या आमच्या सोसायटी धारकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. परंतु या कुदळवाडी भागातील पाच ते सहा हजार स्क्रॅपच्या दुकानांना मुबलक प्रमाणात पाणी दिले जाते. महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी याकडे लक्ष देऊन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही सर्व दुकान त्वरित हटवून आमच्या नागरिकांचे प्रदूषणापासून होणारे नुकसान थांबवावे.पुढील दोन-तीन महिन्यात यावर कारवाई झाली नाही तर आमच्या फेडरेशन मार्फत याबाबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button