breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळात 58.21 टक्के तर शिरूरमध्ये 58.35 टक्के मतदानाची नोंद

  • सायंकाळी सहापर्यंत मतदानाची झाली नोंद
  • रणरणत्या उन्हाचा जाणवला परिणाम

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघात आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडले. मावळ मतदार संघात 58.21 टक्के तर शिरूर मतदार संघात 58.35 टक्के मतदान झाले. दुपारी उन्हाचा पारा वाढल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली होती. सायंकाळी साडेचारनंतर पुन्हा मतदानाचा टक्का वाढला.

मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात, तर शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. त्यासाठी आज मतदान घेण्यात आले. सकाळी उन्हाची तिव्रता वाढण्यापूर्वीच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. दुपारी बारापर्यंत मतदानाचा टक्का वधारत राहिला. त्यानंतर मात्र मतदारांनी विश्रांती घेतल्याचे जाणवले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मावळमध्ये 58.21 टक्के तर शिरूरमध्ये 58.35 टक्के मतदान झाले.

मावळ मतदार संघातील उरण विधानसभा मतदार संघातून सर्वाधीक 61.80 टक्के मतदानाची नोंद झाली. तर, शिरूर मतदार संघातील आंबेगाव विधानसभा मतदार संघातून सर्वाधीक 67 टक्के मतदान झाले.

मावळ लोकसभा मतदारसंघ 58.21 %

पनवेल 55.30 %
कर्जत 60.40 %
उरण 61.80 %
मावळ 61.28 %
चिंचवड 57.30 %
पिंपरी 56.30 %

शिरूर लोकसभा मतदारसंघ 58.35 %
जुन्नर 61.00 %
आंबेगाव 67 %
खेड 59 %
शिरूर 60 %
भोसरी 54 %
हडपसर 54 %

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button