breaking-newsराष्ट्रिय
आंध्र एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग
नवी दिल्ली – नवी दिल्लीहून विशाखापट्टणम येथे जाणाऱ्या आंध्र एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे आग लागली. तथापी या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आगीमुळे नुकसान झालेले डबे काढून तेथे दुसरे डबे जोडल्यानंतर या गाडीला पुढील प्रवासाला अनुमती देण्यात आली.
गाडीचे बी5 आणि बी6 या डब्यांना ही आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाला तेथे तातडीने पाचारण करण्यात आले. तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशाने लागली याचा अजून शोध लागेला नाही. पण आगीत या डब्यांचे बरेच नुकसान झाले आहे. यातील प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.