breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माळेगाव कारखाना निवडणूक; ११ हजार मतासाठी अजितदादाची प्रतिष्ठा पणाला

बारामती – बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जुन्या मित्रानेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेेरीस आणले आहे. येत्या रविवारी, २३ फेब्रुवारीला कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होत असून तावरे यांचे सहकार बचाव पॅनल विरुद्ध अजित पवारांचे श्री नीलकंठेश्वर पॅनल असा हा सामना रंगणार आहे.

या कारखान्यावर शरद पवारांचे जुने मित्र, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांचे वर्चस्व आहे. कारखान्याच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणीत तावरे गटाने २१ पैकी १५ जागा जिंकून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवला होता. उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक ३४०० रुपये भाव देऊन तावरे गटाने कारखान्याचा विस्तार केला आहे. यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीच्या नाकीनऊ आले असून अजित पवार ठिय्या देऊन आहेत. कारखाना ताब्यात घेण्यासाठीच बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घाईघाईने नीरा-देवघरचे पाणी बारामतीला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना १ लाख ६७ हजार मतांचे मताधिक्य लाभले. मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या फक्त ११ हजार ५०९ सभासदांची मते मिळवण्यासाठी अजित पवारांनी गेल्या दोन महिन्यांपासून प्रतिष्ठापणाला लावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button