breaking-newsआंतरराष्टीय

मालीत दोन हेलिकॉप्टरची टक्कर, फ्रान्सचे १३ सैनिक ठार

मालीच्या उत्तरेकडील भागात जिहादींविरुद्ध कारवाई करताना दोन हेलिकॉप्टरची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत मालीतील फ्रान्सच्या बरखान दलाचे १३ सैनिक ठार झाले, असे एलिसीने मंगळवारी सांगितले.

मालीच्या उत्तरेकडील भागात अलीकडेच हल्ले करण्यात आले होते. त्या जिहादींविरुद्ध बरखान दल कारवाई करीत असताना सोमवारी ही दुर्घटना घडली, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. टायगर हेलिकॉप्टर आणि कौगर लष्करी वाहतूक हेलिकॉप्टर यांची हवेतच टक्कर झाली.

दहशतवादाविरुद्ध लढा देताना फ्रान्सच्या ज्या सैनिकांनी आपला जीव गमावला त्या सैनिकांना मॅक्रॉन यांनी आदरांजली वाहिली आहे. या दुर्घटनेत ठार झालेल्या सैनिकांमध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. इस्लामी घुसखोरीविरुद्ध फ्रान्सने २०१३ मध्ये हस्तक्षेप केला, तेव्हापासून फ्रान्सचे ३८ सैनिक ठार झाले आहेत.

फ्रान्सचे ४५०० सैनिक मालीमध्ये आहेत. हवेतच झालेल्या या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button