breaking-newsमहाराष्ट्र

मालवणचे मच्छीमार्केट 17 जुलै पासून खुले; नगरपालिकेचा निर्णय

कोरोना पार्श्वभूमीवर 22 मार्च पासून 114 दिवस बंद असलेले मालवणचे मच्छीमार्केट शुक्रवार (17 जुलै) पासून खुले होणार आहे. आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनंतर पालिका प्रशासनाने मच्छिमार्केट खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मत्स्यविक्रेत्या महिलांनी सोशल डिस्टनस नियमांचे पालन करावे. मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. तसेच ग्राहकांनीही सुरक्षित अंतर ठेवावे. अश्या सूचना मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी मत्स्यविक्रेत्या महिलांना केल्या आहेत.

मच्छीमार्केट बंद असल्याने मत्स्य विक्रेत्या महिला बाहेर बसून मासे विक्री करत होत्या. गेले महिनाभर भर पावसात या महिला मासे विक्री करत होत्या. बंद मार्केट खुले व्हावे अशी मागणी विक्रेत्यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक व पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. यापार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या सोबत बैठक घेतली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, संमेश परब, तपस्वी मयेकर, नरेश हुले यासह मत्स्य विक्रेत्या महिला संघ अध्यक्षा मनीषा जाधव व मत्स्य विक्रेते महिला उपस्थित होते.

सोशल डिस्टनसचे काटेकोर पालन, मास्कचे बंधन कोरोना पार्श्वभूमीवर अन्य खबरदारीच्या उपाययोजनांचे योग्य पालन होणार असेल तर मच्छीमार्केट खुले केले जाईल. दोन दिवसात बंद मार्केट स्वच्छ करून खुले केले जाईल, असे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button