breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

मार्चमध्ये जीएसटीतून 97,597 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

देशाच्या अर्थव्यवस्थेत आधीपासूनच डगमगली होती…. त्यातच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कंपन्यांचे व्यवहारच ठप्प झाल्यामुळे मार्चमध्ये वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन मागील चार महिने म्हणजेच फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच एक लाख कोटी रुपयांच्या खाली गेले आहे.

मार्चमध्ये जीएसटीतून केवळ ९७,५९७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. हा मार्च २०१९च्या १.०६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ८.४ टक्के कमी आहे. 

यापूर्वी जीएसटीतून फेब्रुवारीमध्ये १.०५ लाख कोटी रुपये, जानेवारीमध्ये १.१० लाख कोटी रुपये, डिसेंबरमध्ये १.०३ लाख कोटी रुपये आणि नोव्हेंबरमध्ये १.०३ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मार्चमध्ये ७६.५ लाख जीएसटी रिटर्न दाखल करण्यात आले. तर फेब्रुवारीमध्ये ८३ लाख रिटर्न दाखल झाले होते. याचाच अर्थ मार्चमध्ये जीएसटीच्या अनुपालनात कमतरता राहिल्या आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button