breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

माणुसकी! धर्माच्या पलिकडे माणुसकीचं नातं, पठाण मामाकडून हिंदू भाचींचे कन्यादान

अहमदनगर: भारत हा विविधतेने परंमपरेने नटलेला देश आहे. इथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. याच गोष्टीचा प्रत्यय शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पार पडलेल्या एका लग्न समारंभातून दिसून आला आहे. या लग्नात मुस्लिम समाजाच्या मामाने दोन हिंदू भाचींचे कन्यादान केले. त्यामुळे या लग्नाची सध्या चर्चा सुरु आहे. या लग्नाचे काही फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

बोधेगावच्या सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. संसाराच्या वाटेत पतीने अर्ध्यावरच साथ सोडल्याने त्या माहेरी आल्या होत्या. तिथेच त्यांनी दोन्ही मुलींना लहानाचं मोठं केलं आहे. बोधेगावातील त्यांच्या घराशेजारी बाबा पठाण नावाचे गृहस्थ राहतात. सविता भुसारी यांचे ते मानलेले भाऊ आहेत. त्यामुळे सविता यांच्या मुलींच्या लग्नात बाबा पठाण मामा म्हणून उभे राहिले होते.सविता भुसारी या दरवर्षी पठाण यांना राखी बांधतात. त्यामुळे मुलींच्या लग्नात त्यांनी मामाची भूमिका खंबीरपणे निभावली आहे. भुसारी कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असल्याने मुलांच्या शिक्षणासाठीही बाबाभाईंनी हातभार लावला. सविता यांची मुलगी गौरी बी.ए. झाली. तर धाकटी सावरी हिची बारावी झालेली आहे. दोघींच्या लग्नाचे वय झाल्यावर स्थळासाठी शोधाशोध केली होती. तालुक्यातील मुंगी येथील स्थळ आले होते. तिथेही दोन सख्ये भाऊ लग्नाळू होते. त्यामुळे बाबाभाई यांनीच पुढाकार घेत ते दोघे भाऊ आणि या दोघी बहीणी यांचे लग्न लावून दिले आहे. त्यामुळे धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन या लग्नात घडले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button