breaking-newsराष्ट्रिय

माणसाचा मृत्यू कधी होणार ? गुगलने अचंबित करणारा शोध लावला!

मंबई: मानवाच्या उत्क्रांतीपासून सुरु असलेले नवनवे संशोधन, माणसाचा मृत्यू कधी होणार याचा शोध घेण्यापर्यंत सुरुच आहेत. आजच्या जगात तर अनेक अचंबित करणारे शोध लागत आहे. असंच एक विस्मयकारी संशोधन गुगलने केलं आहे.
माणूस कधी मरणार, हे आता समजणं शक्य होणार आहे. अभिनेता हृतिक रोशनच्या क्रिश या सिनेमात ज्याप्रमाणे माणसाचं भविष्य किंवा मरण कळत होतं, तसंच काहीसं गुगलने शोधले आहे.

अंथरुणाला खिळलेला किंवा उपचार घेत असलेला पेशंटची प्राणज्योत कधी मालवू शकेल, हे सांगणारं सॉफ्टवेअर गुगलने विकसित केलं आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर काम सुरु आहे. याबाबतचा एक प्रयोग गुगलने यशस्वी केला असून त्याचा रिपोर्ट नुकतंच प्रसिद्ध झाला आहे. गुगलची सहयोगी कंपनी अल्फाबेट याबाबतचा संशोधन प्रकल्प राबवत आहे. गुगलच्या या संशोधनाला यश मिळालं तर विज्ञानक्षेत्रासाठी हा शोध मैलाचा दगड ठरेल. गुगलला यापुढे जाऊन मृत्यूचे लक्षण आणि आजार या बाबतचा अचूक अंदाज बांधायचा आहे.

गुगलची मेडिकल ‘ब्रेन टीम’ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (artificial intelligence) सहाय्याने हे खास सॉफ्टवेअर विकसित करत आहे. या सॉफ्टवेअरमध्ये पेशंटची सर्व माहिती भरली जाते. पेशंटच्या मेडिकल टेस्ट, त्याचा आजारपणाचा माहिती, डॉक्टरांचा सर्व तपशील, अशी सर्व माहिती भरली जाते. या माहितीच्या आधारे गुगल विश्लेषण करून त्या पेशंटच्या मृत्यूचा कालावधी काय असेल त्याचा अंदाज बांधणार आहे.

या संशोधनाचा प्रयोग एका कॅन्सरग्रस्त महिलेवर करण्यात आला. या महिलेला स्तनांचा कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर उपचार केले. त्यानंतर गुगलनं मिळालेल्या माहितीच्या आधारावर महिलेची जगण्याची शक्यता 19.9 टक्के असल्याचं सांगितलं आणि 10 दिवसातच त्या महिलेचा मृत्यू झाला. स्टॅनफोर्ड युनव्हर्सिटीच्या मदतीनं गुगल हा प्रकल्प राबवत आहे. हा प्रयोग सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. अधिकच्या संशोधनानंतर याचा पूर्ण वापर करता येईल.

गुगलने इतर तंत्रज्ञानापेक्षा इतक्या जलद अशाप्रकारचे संशोधन केल्याने वैद्यकीय तज्ज्ञसुद्धा अचंबित झाले आहे. अनेक रुग्णालय आणि डॉक्टरांनी अनेक चांगल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण ही सर्व उपकरणे महाग आणि वेळ खाऊ आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणताही दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र गुगल याचा कोणतही दुरुपयोग कधीही होऊ देणार नाही असं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button