breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझं राहुल गांधींवर प्रेम आहे! अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

मुंबई –  निवडणुकांच्या धामधुमीदरम्यान सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अनेक जण आपापल्या आवडत्या नेत्याच्या समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत. त्यांच्याविषयी जाहीरपणे बोलू लागले आहेत. पण, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आपलं प्रेम असल्याची कबुली एका अभिनेत्रीने दिली आहे. तशी पोस्ट तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

या अभिनेत्रीचं नाव आहे माहिका शर्मा. नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिलेल्या माहिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून राहुल गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्याखाली तिने आपण त्यांच्या प्रेमात असल्याचं म्हटलं आहे. त्याचं कारणही तिने तिथे विशद केलं आहे. आपल्या भाषणांनी सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याच्या गुणामुळे राहुल गांधींवर माझं प्रेम आहे. प्रजेच्या चेहऱ्यावर हसू कायम ठेवणं हे राजाचं कर्तव्य असतं असंही तिने या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

माहिकाने यापूर्वीही एका पोस्टमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींचा विजय व्हावा म्हणून चैत्र नवरात्रीचं व्रत करणार असून त्यासाठी उपवासही करणार असल्याचं म्हटलं होतं. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. तू मॉडेल म्हणून करिअर सुरूही केलेलं नाही आणि आताच ते का संपवत आहेस, असे प्रश्न नेटकरी तिला विचारत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button