breaking-newsमुंबई

माजी आमदार रामनाथ मोते यांचे निधन

गेली 48 वर्षे शिक्षण चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे माजी आमदार रामनाथ मोते यांचे आज किडनीच्या आजाराने निधन झाले. त्यातच त्यांना कोरोनानेही गाठले होते. त्यांच्या निधनाने शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी लढवय्या लोकप्रतिनिधी हरपला असल्याची भावना शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे. ते 68 वर्षांचे होते.

शिक्षक परिषदेच्या माध्यमातून रामनाथ मोते यांनी ठाणे जिल्ह्यातील असंख्य शिक्षकांचे प्रश्न सोडवले. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढाही दिला. दोनदा कोकण शिक्षक मतदार संघातून त्यांनी प्रतिनिधीत्व केले. विधान परिषदेत मोते यांची शंभर टक्के उपस्थिती असायची. अजातशत्रू म्हणून त्यांचा लौकिक होता. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते.

लिपिक ते उत्कृष्ट संसदपटू

उल्हासनगरातील सरस्वती विद्यालयात रामनाथ मोते यांनी लिपिक पदापासून आपली शैक्षणिक कारकीर्द सुरू केली. शाळेतील शिक्षकांच्या समस्या तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्नही त्यांनी समजून घेतले. परीक्षा देऊन याच विद्यालयामध्ये ते शिक्षक झाले. त्यानंतर शिक्षकांच्या विविध प्रश्नांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला.कायम विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबतचा लढा महत्त्वाचा मानला जातो. स्वयंअर्थ सहयिता धोरणावर त्यांनी प्रचंड टीका केली होती. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला होता. लिपिक ते उत्कृष्ट संसदपटू असा दीर्घ प्रवास करणारा शिक्षकांचा नेता हरपला, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button