breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
महिलेकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
मुंबई – मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केली. वाहतुकीचे नियम मोडल्याने पोलिसाने तिला रोखत कारवाई केली. परंतु पोलिसाने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा करत महिलेने पोलिसांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मारहाण प्रकरणी आरोपी महिला सादविका तिवारी आणि तिचा मित्र मोहसीन खान यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.