breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

महिला बॉक्सिंग : २०२० ऑलिंम्पिक पात्रता फेरीत मेरी कोमची धडक; झरीनचा पराभव

५१ किलो वजनगटात निखात झरीनचा पराभव

नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

भारताची आघाडीची मुष्टीयोद्धा मेरी कोम हिने ऑलिम्पिक पात्रता अंतिम फेरीत निखत झरीनला आस्मान दाखवले. ही लढत एकतर्फी झाली. ९-१ अशा फरकाने मेरीने हा सामन् खिशात घातला. पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता सामन्यात निखत झरीनशी मुकाबला झाला. महिला मुष्टीयोद्धा चाचणीच्या ५१ कि.ग्रॅ. गटात या दोघींचा अंतिम सामना रंगला.
ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवरून काही दिवसांपूर्वी वाद रंगला होता. झरीनने मेरी कोम हिच्या विरोधात ट्रायलची मागणी करून खळबळ उडवून दिली होती. मेरी कोमने सांगितलं होतं की बॉक्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएफआय) धोरणाचं आपण पालन करू. बीएफआयने शेवटी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या वादाची पार्श्वभूमी अशी की बीएफआय अध्यक्ष अजय सिंह यांनी एका कार्यक्रमात जाहीर केलं होतं की मेरी कोमच्या सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीमुळे तिला कोणत्याही चाचणीशिवाय ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवले जाईल. यावर नाराज होत झरीनने तिला संधी देण्याची मागणी केली होती.

मेरी कोमने झरीनशी हात मिळवला नाही…

लढत जिंकल्यानंतर मेरी कोम हिने झरीनशी हस्तांदोलन केले नाही. मेरी म्हणाली, मी का हस्तांदोलन करावे. अगोदर झरीन हिनेच इतरांचा आदर करायला शिकले पाहिजे. तीने ज्या पद्धतीने वक्तव्य आणि भूमिका घेतली. ते मला आवडलेले नाही. तिने स्वत:ला मला अशा स्वभावाचे लोक आवडत नाहीत. फक्त आपला मुद्दा रिंगच्या आत सिद्ध करा, बाहेर बोलण्यास काहीही अर्थ नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button