breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिला पोलिसांच्या आरोग्यासाठी पोलीस ठाण्याला पाच सॅनिटरी नॅपकिन, व्हेंडिंग मशीन भेट

पिंपरी – महिला पोलिसांच्या आरोग्यासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे आकुर्डी, यमुनानगर व प्राधिकरण पोलीस चौकीसह निगडी वाहतूक विभाग कार्यालयात प्रत्येकी एक असे पाच सॅनिटरी व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर मशीन भेट देण्यात आले.

यमुनानगर पोलीस चौकीत झालेल्या कार्यक्रमास हेमंत कुलकर्णी, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, महिला पोलीस मनीषा पाटील, मनीषा कांबळे, अर्चना शेलुकर, मुग्धा कुलकर्णी, विजय काळभोर, सुहास ढमाले, गुरूदीप सिंग भोगल, साधना काळभोर, उमा रंगनाथन, सुजाता ढमाले, शीतल खिंवसरा, सोनाली जयंत आदी उपस्थित होते.
 

सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर बसविल्यामुळे निगडी पोलीस ठाण्यात काम करणा-या महिला पोलीस कर्मचारी, बंदोबस्तासाठी येणा-या महिला कर्मचारी तसेच तक्रारी व अन्य कामानिमित्त येणा-या सर्व महिलांना याचा लाभ होणार आहे. सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनमधून नवीन सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. तर इन्सिनरेटर या मशीनमध्ये वापरलेले नॅपकिन जमा करता येणार आहेत. यामुळे सॅनिटरी नॅपकिन रस्त्यावर, कचराकुंड्यांमध्ये उघड्यावर टाकल्याने उद्भवणा-या विविध त्रासांपासून सुटका मिळणार आहे. इन्सिनरेटरद्वारे वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यात येते.

निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले म्हणाले की, सॅनिटरी नॅपकिनची सर्वत्र उपलब्धता ही काळाची गरज आहे. ही गरज सर्वांनी ओळखून अशा स्तुत्य उपक्रमांना चालना द्यायला हवी. पोलीस ठाण्यात सतत महिलांचा वावर असतो. हा उपक्रम पोलीस ठाण्यात सुरु केल्याने गरजू महिलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button